Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीनिमित्त महिलांना मिळणार मोठे गिफ्ट! एक सोबत जमा होणार ₹3000?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana December and January Installment Date: नवीन वर्षाची सुरुवात राज्यातील लाखो-कोट्यवधी महिलांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Ladki Bahin Yojana December and January Installment Date

साधारणपणे या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र काही तांत्रिक अडचणी, डीबीटी प्रक्रियेत झालेला उशीर आणि माहिती पडताळणीमुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला नव्हता. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी होती. पण आता राज्य सरकारने हा प्रलंबित डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा नियमित हप्ता असे दोन्ही मिळून एकत्र देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीपूर्वी म्हणजे 14 जानेवारीच्या आत ही रक्कम महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची तयारी सुरू आहे. सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक हातभार लागावा, घरखर्च, किराणा, मुलांच्या गरजा भागवता याव्यात, यासाठीच सरकारकडून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून 3000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होणार असल्याने लाडक्या बहिणींमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे.

हा लाभ नेमका कोणाला मिळणार, हा प्रश्नही महिलांमध्ये विचारला जात आहे. तर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे आणि डीबीटी प्रक्रिया पूर्ण आहे, अशा सर्व पात्र महिलांना हा एकत्रित हप्ता मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांना मागील महिन्यात तांत्रिक कारणांमुळे पैसे मिळाले नव्हते, त्यांनाही या वेळी दोन्ही महिन्यांचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महायुती सरकारने ही योजना सुरूच ठेवण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याच दिशेने हे पाऊल मानलं जात आहे.

दरम्यान, सरकारकडून महिलांना एक महत्त्वाचं आवाहनही करण्यात येत आहे. लाडक्या बहिणींनी आपलं बँक खाते अ‍ॅक्टिव्ह आहे का, केवायसी पूर्ण आहे का, आधार-बँक लिंक आहे का, याची खात्री करून घ्यावी. कारण डीबीटीद्वारे थेट खात्यात पैसे जमा होणार असल्याने छोट्याशा त्रुटीमुळेही हप्ता अडकू शकतो. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यातच पैसे जमा होण्याची शक्यता असल्याने महिलांनी वेळेत बँक किंवा संबंधित केंद्रात चौकशी करून घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.

याचदरम्यान एक महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. केवायसी पूर्ण केल्यानंतरही काही महिलांना लाभ मिळणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण आता सरकारकडून लाभार्थी महिलांच्या माहितीची पुनःपडताळणी केली जाणार आहे. यात केवळ कागदपत्रेच नाही, तर कुटुंबाचं उत्पन्न, पात्रतेचे निकष यांचीही तपासणी होणार असल्याची माहिती आहे. या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ थांबवला जाऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे काही महिलांमध्ये चिंता देखील दिसून येत आहे.

एकूणच पाहता, संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना मिळणारे हे 3000 रुपयांचे वाण अनेक कुटुंबांना दिलासा देणारे ठरणार आहे. मात्र त्याच वेळी पात्रतेच्या निकषांवर सरकारकडून कडक नजर ठेवली जाणार असल्याने, लाभ टिकवण्यासाठी महिलांनी सर्व प्रक्रिया नीट पूर्ण ठेवणं तितकंच गरजेचं आहे.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीनिमित्त महिलांना मिळणार मोठे गिफ्ट! एक सोबत जमा होणार ₹3000?”

Leave a Comment

error: Content is protected !!